मेक अप  पुढारी
lifestyle

दसऱ्यासाठी खास तयार व्हायचं तर या सोप्या मेक अप टिप्स जरूर फॉलो करा

पुढारी वृत्तसेवा

सणादिवशी खास दिसावं असं प्रत्येकीलाच वाटत असत. पण अनेकदा मेक अप करताना होणाऱ्या बारीक सारिक चुकांमुळे काही तरी कमतरता राहिल्यासारखी वाटते. त्यामुळे या दसऱ्याला आम्ही दिलेल्या सोप्या टिप्स वापरुन मेक अप करा.

चेहऱ्याची गरज ओळखा : अनेकदा मेक अप करताना सेलिब्रिटींनी वापरलेले प्रॉडक्ट वापरुन मेक अप करण्याचा अनेक जणी प्रयत्न करतात. पण असं न करता तुमच्या त्वचेची गरज ओळखून मेक अप प्रॉडक्ट निवडा. उदा. तुमचा चेहरा तेलकट असेल तर वॉटर बेस प्रॉडक्ट निवडा

बर्फ : मेक अप केल्यानंतर फार घाम येऊ नये किंवा चेहरा काळवंडू नये यासाठी मेक अप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ फिरवा.

लॉन्ग लास्टिंग फाउंडेशन : फाउंडेशन निवडताना ते लॉन्ग लास्टिंग असावं जेणेकरून मेक अप जास्त वेळ चेहऱ्यावर राहील.

वॉटर प्रूफ आय मेक अप : मेक अप मध्ये डोळ्यांच्या मेक अपला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे तो विस्कटू नये यासाठी वॉटर प्रूफ मेक अप करतात. त्यामुळे हे प्रॉडक्ट आवर्जून वॉटर प्रूफ असतील याची काळजी घ्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT