आजकाल आरोग्यदायी जीवनशैली राखण्यासाठी अनेक जण व्हिटॅमिन, मिनरल्स आणि इतर पूरक आहार (सप्लीमेंट्स) घेतात. मात्र, हे सप्लीमेंट्स कोणत्या वेळी घ्यायचे याचा अचूक ज्ञान नसेल, तर याचा शरीरावर परिणाम कमी होऊ शकतो किंवा साइड इफेक्ट्सही होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळेस घेतलेले सप्लीमेंट्सच शरीराला पूर्ण लाभ देतात. चला तर मग जाणून घेऊया कोणते सप्लीमेंट्स केव्हा घ्यावेत.
हाडांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन D अत्यंत महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, हे सप्लीमेंट्स सकाळच्या नाश्त्यानंतर घ्यावे. रात्री घेतल्यास झोपेवर परिणाम होऊ शकतो.
ओमेगा-3 सप्लीमेंट्स दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर घ्यावेत. यामुळे शरीराला पोषक तत्त्वांचे शोषण चांगल्या प्रकारे होते. मात्र, वर्कआउटनंतर हे घेणे टाळा.
मॅग्नेशियम चयापचय (मेटाबॉलिझम) सुधारण्यात मदत करते. हे संध्याकाळी किंवा झोपण्यापूर्वी घेणे उत्तम असते. थायरॉइड असलेल्या रुग्णांनी मॅग्नेशियम आणि थायरॉइड औषधांमध्ये 3-4 तासांचे अंतर ठेवावे.
व्हिटॅमिन B12 मेटाबॉलिझम वाढवते तर व्हिटॅमिन C रोगप्रतिकारक शक्ती आणि कोलेजन वाढवते. हे दोन्ही सप्लीमेंट्स जेवणाआधी घ्यावेत. यामुळे त्यांचे शोषण अधिक परिणामकारक होते. मात्र, B12 आणि आयर्न एकत्र घेऊ नये.
स्वस्त आणि कमी दर्जाचे सप्लीमेंट्स घेणे टाळा.
कोणतेही सप्लीमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
नियमित वेळा आणि योग्य पद्धतीनेच सप्लीमेंट्स घ्या.