Latest

Wife Killed Husband : 15 लाखांच्या विम्यासाठी LIC एजंट पत्नीने केला पतीचा खून

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंजाबच्या अमृतसरमध्ये विमा पॉलिसीचे पैसे हडपण्यासाठी पत्नीने पतीचा खून केल्याचे समोर आले आहे. पण संशयीत आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. आपला नवरा खूप दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे घर चालवणे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणेही कठीण झाले होते. अखेर नव-याच्या विम्याचे पैसे मिळवणे हाच एक पर्याय होता, त्यामुळे मी त्यांचा खून केला, असे संशयीत आरोपी महिलेने सांगितले. (Wife Killed Husband)

डीएसपी सुखविंदरपाल सिंह यांनी सांगितले की, 5 मे रोजी सकाळी मनजीत सिंग त्यांची पत्नी नरिंदर कौरसह बियास रुग्णालयात औषध घेण्यासाठी निघाले होते. यानंतर त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह देहरीवाल रस्त्यावर पडलेला आढळून आला. त्यांची पत्नीही जखमी झाली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. जखमी पत्नीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. (Wife Killed Husband)

तपासादरम्यान पोलिसांना कळले की, मनजीत सिंग हे गेल्या 20 वर्षांपासून अनेक आजारांनी त्रस्त होते. त्यांच्यावर बियास येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि उदरनिर्वाह करणे कठीण होते. या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. (Wife Killed Husband)

मृत मनजीत सिंग यांची पत्नी एलआयसी एजंट होती. तिने पतीचा 15 लाखांचा विमा उतरवला होता आणि स्वत:ला नॉमिनी केले होते. अशा परिस्थितीत तिला कल्पना आली की जर आपल्या पतीचा मृट्यू झाला तर आपल्याला विम्याचे पैसे मिळतील. यानंतर तिने पतीच्या खूनाचा कट रचला. एके दिवशी आजारी मनजीत सिंग यांची पत्नी पतीला घेऊन रुग्णालयात गेली, अन् वाटेतच तिने पतीचा खून केला. पण तिने आपल्यावर चोरट्यांनी हल्ला केला आणि आपल्याकडील पैसे पळवून नेले, तसेच पतीलाही जिवे मारले असा बनाव केला. पण पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य समोर आले.

डीसीपी सुखविंदर पाल सिंह यांनी सांगितले की, महिलेला पतीच्या खूनाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खुनाच्या घटनेचे वर्णन दरोड्याची घटना म्हणून करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT