पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील मोठी बँक मॉर्गन स्टॅनली (Morgan Stanley layoff) आणखी ३ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत आहे. ही बँक सहा महिन्यांच्या आत दुसऱ्या फेरीत मोठ्या प्रमाणात नोकरकपात करत आहे. आर्थिक मंदीमुळे बँकिंग क्षेत्र संकटात सापडले आहे. आर्थिक उलाढालीत घट झाल्यामुळे खर्च कपातीचा एक भाग म्हणून हा नोकरकपातीचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. (Layoff News)
दुसऱ्या तिमाहीत नोकरकपातीची (job cuts) पुढील फेरी होईल, असे वृत्त ब्लूमबर्ग न्यूजने मंगळवारी दिले आहे. मॉर्गन स्टॅनलीने डिसेंबर २०२२ मध्ये १,२०० नोकऱ्या कमी केल्या होत्या. बँकेच्या महसुलावर तिच्या गुंतवणूक बँकिंग युनिटच्या शुल्कात घट झाल्यामुळे परिणाम झाला आहे. ज्यामुळे अलीकडील तिमाहीत एकूण महसुलात जवळपास २ टक्क्यांनी घट होऊन ते १४.५ अब्ज डॉलरवर आले आहे. गेल्या महिन्यात मॉर्गन स्टॅनलीचे मुख्य वित्तीय अधिकारी शेरॉन येशाया यांनी बाजारातील अनिश्चित वातावरण आणि वाढत्या महागाईमुळे खर्च व्यवस्थापनाच्या महत्त्वावर लक्ष दिले जात असल्याचे म्हटले होते. (Morgan Stanley job cuts)
मॉर्गन स्टॅनली बँकेत सुमारे ८२ हजार कर्मचारी काम करतात. पण नोकरकपातीचा सुमारे ४ टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. मॉर्गन स्टॅनली ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा कंपनी आहे. याचे मुख्यालय मिडटाउन मॅनहॅटन, न्यूयॉर्क येथे आहे. या बँकेची ४१ देशांमध्ये कार्यालये आहे. सध्याच्या मंदीत नोकरकपात करणारी एकमेव मॉर्गन स्टॅनली हा एकमेव गुंतवणूक बँक नसून याआधी गोल्डमन सॅक्स, बार्कलेज, जेपी मॉर्गन, सिटीग्रुप सारख्या वित्तीय सेवा पुरवठादारांनीही हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. (. (Morgan Stanley layoff)
हे ही वाचा :