Latest

हेट स्पीचमुळे इम्रान खान यांच्यावर अटकेची तलवार

backup backup

इस्लामाबाद ः वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान एका भाषणावरून अडचणीत आले आहेत. शनिवारी रात्री केलेल्या भाषणात इम्रान यांनी पाकिस्तानचे पोलिस आणि न्यायधीशांना धमकी दिली होती. त्यानंतर पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने (पीईएमआरए) इम्रान यांच्या भाषणांचे थेट प्रसारण करणे थांबवले आहे. पोलिस कारवाईची तयारीही केली जात आहे. इम्रान यांना कोणत्याही क्षणी अटक केले जाण्याची शक्यता आहे.

इम्रान यांनी इस्लामाबादमधील भाषणात म्हटले होते की, पाकिस्तानचे पोलिस कोणाच्याही निर्देशानुसार माझ्या पक्षाच्या नेत्यांना अटक करत आहे. मी विचारले तर सांगतात, आदेश पाळत आहे. न्यायव्यवस्थेनेही परिणामांसाठी तयार राहावे. गिल यांना रिमांडवर घेण्याचे आदेश देणार्‍या महिला न्यायाधीशाविरोधात अ‍ॅक्शन घेऊ. पीईएमआरएने म्हटले आहे की, खान यांनी संविधातील कलम 19 चे उल्लंघन केले आहे. ते सातत्याने लष्कर, पोलिस, न्यायव्यवस्थेविरोधात बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांच्या भाषणांनी द्वेष पसरत आहे. दरम्यान, इम्रान यांना अवैध फंडिंगबद्दल अटक होऊ शकते. त्यांच्या पक्षाचा निधी आणि अकाऊंटची तपासणी होऊ शकते.

SCROLL FOR NEXT