Latest

‘ही’ कंपनी म्हणते… मिटिंग म्हणजे वेळेचा अपव्यय !

मोहन कारंडे

ओट्टावा : खासगी कंपन्यांमध्ये नियमित होणाऱ्या मिटिंग हा दैनंदिन कामकाजाचा भाग असतो. मात्र, कॅनडातील एका कंपनीने ही मिटिंग संस्कृतीच संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. शॉपिफाय ही कॅनडातील ई-कॉमर्स कंपनी आहे. मिटिंग म्हणजे वेळेचा अपव्यय असल्याचे कंपनीने म्हटले असून, दोनपेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या सर्व मिटिंग तसेच ग्रुप चॅटपासून इतर कर्मचाऱ्यांनी दूर राहावे, कंपनीचे अधिकारी त्यासाठी इतरांना प्रोत्साहित करतील.

५० पेक्षा अधिक जणांचा समावेश असणारी मिटिंग केवळ गुरुवारी ठराविक वेळेतच घेतली जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, एका पाहणीनुसार, कर्मचारी आठवड्यातील सरासरी १८ तास मिटिंगसाठी खर्च करतात. केवळ १४ टक्के कर्मचारी मिटिंग इनव्हिटेशन स्वीकारत नाहीत. बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारी अनावश्यक मिटिंगमध्ये सहभागी झाल्याने १० कोटी डॉलरचे नुकसान होते.

SCROLL FOR NEXT