Latest

हिजाब न घालता इराणी अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

दिनेश चोरगे

तेहरान :  इराणमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिजाबविरोधात आंदोलन सुरू आहे. याचदरम्यान पोलिसांनी दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना अटक केली आहे. दोघीही हिजाबला विरोध करत आहेत. अभिनेत्री हेंगामेह गाजियानी आणि कातायुन रियाही यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघींनीही हिजाबविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती.

52 वर्षीय हेंगामेह गाजियानी हिने इन्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये तिने हिजाब न घातल्याचे दिसत आहे. हा माझा कदाचित शेवटचा व्हिडीओ असेल. यानंतर काय व्हायचे ते होऊ दे; मात्र मी शेवटच्या श्वासापर्यंत इराणच्या लोकांसमवेत राहीन आणि हिजाबला विरोध करेन, असे कॅप्शन गाजियानी हिने आपल्या व्हिडीओला दिले आहे. गजियानी हिने एक पोस्ट टाकत सरकार मुलांचे हत्यारे असून, 50 तरुणांच्या हत्येला सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT