Latest

हजसाठी यंदा भारताला सर्वोच्च कोटा;देशातील 1,75000 मुस्लिमांना यंदा संधी

दिनेश चोरगे

रियाध; वृत्तसंस्था : यंदा सौदी अरेबियाने भारतासाठी हजचा कोटा वाढवला आहे. यावेळी एक लाख 75 हजार 25 भारतीय हजला जाणार आहेत. कोणत्याही देशासाठी हा आतापर्यंतचा सर्वोच्च कोटा आहे. 2019 मध्ये एक लाख 40 हजार भारतीयांनी हज यात्रा केली होती. सौदी अरेबियाने हज यात्रेवर कोरोना काळात घातलेले निर्बंध आता पूर्णपणे हटवले आहेत. हजसाठीची वयोमर्यादाही रद्द केली आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आता हज यात्रेला जाता येईल.

हजसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झाले असून, 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. हज यात्रेकरू हज मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन थेट अर्ज करू शकतात. एकच मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त अर्जासाठी वापरू नये, असे कळविण्यात आले आहे.

2019 ला जगभरातून 25 लाख, 20 मध्ये 1 हजार

  • 2019 मध्ये जगभरातून 25 लाख लोक हजला गेले होते. 2020 मध्ये कोरोनामुळे ही संख्या रोडावून एक हजारवर आली होती. कोरोना काळात सौदी अरेबियाच्या रहिवाशांना तसेच 20 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांनाच हज यात्रा करता आली होती.
  • 2021 मध्ये आणखी काही निर्बंधांसह सौदीच्याच 60 हजार लोकांना हजची परवानगी देण्यात आली होती. 2022 मध्ये मात्र अन्य देशांतील कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेल्यांना परवानगी देण्यात आली होती.

यंदा उमरा व्हिसाचा कालावधीही 30 दिवसांवरून 90 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. येणारे लोक देशातील कोणत्याही शहरात जाऊ शकतील.
तौफिक अल-रबिया,
हज आणि उमरा मंत्री, सौदी अरेबिया

SCROLL FOR NEXT