Latest

स्पाईसजेटच्या विमानावर ‘चंद्रमुखी’चे पोस्टर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

मराठी चित्रपट आता प्रसिद्धी व यशाचे नवे मापदंड निर्माण करीत आहेत. अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'चंद्रमुखी' हा चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. मराठी मनोरंजन विश्‍वात पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाचे पोस्टर विमानावर झळकले आहे. स्पाईसजेटच्या विमानावर 'चंद्रमुखी' या चित्रपटाचे पोस्टर झळकले. हा मान मिळवणारी अमृता ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे. या प्रमोशनसाठी अमृता आणि आदिनाथ विमानतळावर उपस्थित होते. अमृताने यावेळी लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती.

SCROLL FOR NEXT