सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा इथल्या शीख शिकलगार वस्तीमध्ये आज (सोमवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका युवकाचा खून करण्यात आला. धारदार शस्त्राने त्याच्या छातीमध्ये वार करून हा खून केल्याचे समोर आले आहे.
रवीसिंग सिसपाल सिंग टाक (वय 22) असे मृताचे नाव आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ नातेवाईकांनी जखमी अवस्थेत रवीसिंग याला सिव्हीलमध्ये आणले. मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. मारेकरी हे त्यांच्याच वस्तीमध्ये रहिवासी असत्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा :