Latest

सोलापूर : जल्लोषात राष्ट्रवादी, शिवसेनाही सहभागी

Shambhuraj Pachindre

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमतात येताच सोलापूर शहरातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पदाधिकार्‍यांनी थेट भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तर मतदारसंघातील बाळवेस येथे फटाके फोडत, मिठाई वाटून आनंद साजरा केला. काँग्रेसच्या जल्लोषात राष्ट्रवादी व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेतेही सहभागी झाले होते.

शनिवारी सकाळपासूनच कर्नाटक निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली होती. काँग्रेस बहुमतात सत्तेत येणार असा कल दिसताच कार्यकर्त्यांनी शहरातील काँग्रेस मुख्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बाळीवेस येथे मोठा जल्लोष केला. यात महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. रखरखत्या उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. त्यांनी फटाके फोडत एकमेकांना मिठाई भरवली. काँग्रेसच्या या जल्लोषात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव, शिवसेना शहरप्रमुख विष्णू कारमपुरी हेही सहभागी झाले
होते.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी नगरसेवक विनोद भोसले, तौफिक हातुरे, युवक आघाडी अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी महापौर सुशीला आबुटे, शहराध्यक्ष हेमा चिंचोळकर, संध्या काळे, श्रीशैल रणधिरे, नाना क्षीरसागर, अंबादास करगुळे, वाहिद विजापुरे, तिरुपती परकीपंडला, सिद्धाराम चाकोते, नरसिंग आसादे, अंबादास करगुळे, देवाभाऊ गायकवाड, भीमाशंकर टेकाळे, वाहिद बिजापुरे, एन के क्षीरसागर, अंबादास गुत्तिकोंडा, विश्वनाथ साबळे, नागनाथ कदम, हाजीमलंग नदाफ, रॉकी बंगाळे, सिद्राम अट्ठेलूर, तिरुपती परकीपंडला, हनमंतु सायबोलू यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आ. शिंदेनी प्रचार केलेल्या सहा जागांवर विजय

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस व आमदार प्रणिती शिंदे या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या वतीने स्टार प्रचारक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्यावर दावणगिरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा जागांपैकी सहा जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत

लोकांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की जातीय विष पेरून मतदान घेता येत नाही. भाजपच्या खोट्या आश्वासनाला यावेळी कर्नाटकमधील जनता बळी पडली नाही. सर्वधर्मसमभाव व विकास यालाच जनतेने पाठिंबा दिला, येणार्‍या लोकसभा निवडणुकीतही जनतेचा हाच कल राहील.

– आमदार प्रणिती शिंदे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT