Latest

सोलापूर : 1820 लिटर हातभट्टी दारू जप्त

Arun Patil

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : उत्पादन शुल्क विभागाने आज (दि. 20) मुळेगाव तांड्यावर घरातून 1820 लिटर हातभट्टीसह 93 हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

उत्पादन शुल्क विभागाच्या सीमा तपासणी नाका व भरारी पथकाने मुळेगाव तांड्याच्या पश्चिमेस विवेकानंद नगर येथील एका घरावर धाड टाकली. तेथे अनिता संजय राठोड (वय 41 वर्षे) या महिलेच्या ताब्यातून हातभट्टी दारू भरलेल्या 70 लिटर क्षमतेच्या 26 रबरी ट्यूबा अशी एकूण 182 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई सीमा तपासणी नाक्याच्या दुय्यम निरिक्षक मानसी वाघ, भरारी पथक दुय्यम निरीक्षक एस ए पाटील, सुरेश झगडे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, जवान तोग्गी, दशवंत, बेगमपुरे व वाहनचालक जडगे व वाघमारे यांनी केली.

SCROLL FOR NEXT