Latest

सोलापूर : महिलेची लाखाची ऑनलाईन फसवणूक

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : तुमचे क्रेडिट कार्ड बंद झाले आहे असे म्हणून सायराबानू नदाफ या महिलेचा ओटीपी नंबर मिळवून त्यांच्या बँक खात्यातील 1 लाख 3 हजार 406 काढून फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी सायराबानू मकदुमसाब नदाफ (वय 54, रा. मार्कंडेयनगर, कुमठा नाका) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सायराबानू यांच्या मोबाईलवर अज्ञात महिलेचा फोन आला. क्रेडिट कार्ड बंद झाले आहे, असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर घेतला व सायराबानू यांच्या एसबीआय शाखा, होटगी रोड या बँकेत फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवरुन तीन वेळेस 1 लाख 3 हजार 406 रुपये काढून फसवणूक केली.

SCROLL FOR NEXT