Latest

सोलापुरात यंत्रमागांची धडधड बंद; 6 कोटींची उलाढाल ठप्प

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  सूत दरात 300 टक्क्यांची वाढ यासह मूलभूत सुविधांसाठी सोलापुरातील यंत्रमागधारकांनी सोमवारी (दि. 6) कडकडीत लाक्षणिक बंद पाळला. यामुळे वस्त्रनगरीतील यंत्रमागांची नेहमीची धडधड बंद होती. अक्कलकोट रोड एमआयडीसी ओस पडल्याचे चित्र दिसून आले. यामुळे सुमारे सहा कोटींहून अधिक उलाढाल ठप्प झाली. दरम्यान, कामगारांना विश्वासात न घेता हे आंदोलन केल्याबद्दल 'सिटू'ने सभेद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली.

गेल्या काही वर्षांपासून सूत दरात सातत्याने वाढ होत गेली. मात्र, मागील सात-आठ महिन्यांमध्ये झालेली वाढ लक्षणीय होती. आतापर्यंत झालेली वाढ ही 250 ते 300 टक्क्यांच्या घरात गेल्याने यंत्रमाग उद्योग संकटात सापडला. सूत दरवाढीच्या तुलनेत पक्क्या मालाला दर वाढवून मिळत नसल्याने यंत्रमागधारक हवालदिल झाले. अशातच अक्कलकोट रोड एमआयडीसीत पाणी, रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती आदी मूलभूत सुविधांची वानवा असल्याने या उद्योगावर मोठा परिणाम जाणवत आहे.

या सर्व बाबींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा यंत्रमागधारक संघाने सोमवारी लाक्षणिक बंद केला. बंदमुळे एमआयडीसीसह अशोक चौक, नीलमनगर, माधवनगर गांधीनगर, भद्रावती पेठ, भवानी पेठ, दत्तनगर, रविवार पेठ आदी मिक्स झोनमधील यंत्रमाग बंद होते. त्यामुळे बुधवारच्या साप्ताहिक सुट्टीप्रमाणे या परिसरात शांतता होती.

मागण्यांबाबत दिले निवेदन

संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. सूत दर स्थिर ठेवण्याबाबत केंद्र व राज्याने धोरण आखावे, कापसाची कापसाच्या साठेबाजीला आळा घालावा, कापसाच्या कमोडिटी मार्केट वरील व्यवहारांवर निर्बंध घालावेत, एमआयडीसीत मूलभूत सुविधा द्याव्यात, यंत्रमाग उद्योगासाठी पाण्याचे आरक्षण ठेवावे आदी विविध मागण्यांचा यामध्ये समावेश होता.

निवेदन देतेवेळी संघाचे प्रेसिडेंट धर्मण्णा सादूल, अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सरचिटणीस राजू राठी, सहखजिनदार अंबादास बिंगी, दीनानाथ धुळम, नीलेश फोफलिया, सुधाकर इराबत्ती आदी उपस्थित होते.

कामगारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

दरम्यान या बंदविरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सने (सिटू) एमआयडीसीत सभा घेतली. यावेळी कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम म्हणाले की, यंत्रमागधारकांनी एकतर्फी बंद केला, कामगारांना विश्वासात घेतले नाही. यंत्रमागधारकांसाठी 'अच्छे दिन' आणायचे असतील तर मालक व कामगारांना केंद्र व राज्य सरकारशी दोन हात करावे लागतील. त्यासाठी कामगारांसाठी सतत संघर्ष करणार्‍या 'सिटू'ला यंत्रमाग धारकांनी विश्वासात घेण्याची गरज आहे. सर्व कामगारांना बंद काळातील नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणीही आडम यांनी केली.

मागण्यांबाबत दिले निवेदन :

संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. सूत दर स्थिर ठेवण्याबाबत केंद्र व राज्याने धोरण आखावे, कापसाची कापसाच्या साठेबाजीला आळा घालावा, कापसाच्या कमोडिटी मार्केट वरील व्यवहारांवर निर्बंध घालावेत, एमआयडीसीत मूलभूत सुविधा द्याव्यात, यंत्रमाग उद्योगासाठी पाण्याचे आरक्षण ठेवावे आदी विविध मागण्यांचा यामध्ये समावेश होता. निवेदन देतेवेळी संघाचे प्रेसिडेंट धर्मण्णा सादूल, अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सरचिटणीस राजू राठी, सहखजिनदार अंबादास बिंगी, दीनानाथ धुळम, नीलेश फोफलिया, सुधाकर इराबत्ती आदी उपस्थित होते.

कामगारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी : दरम्यान या बंदविरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सने (सिटू) एमआयडीसीत सभा घेतली. यावेळी कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम म्हणाले की, यंत्रमागधारकांनी एकतर्फी बंद केला, कामगारांना विश्वासात घेतले नाही. यंत्रमागधारकांसाठी 'अच्छे दिन' आणायचे असतील तर मालक व कामगारांना केंद्र व राज्य सरकारशी दोन हात करावे लागतील. त्यासाठी कामगारांसाठी सतत संघर्ष करणार्‍या 'सिटू'ला यंत्रमाग धारकांनी विश्वासात घेण्याची गरज आहे. सर्व कामगारांना बंद काळातील नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणीही आडम यांनी केली.

SCROLL FOR NEXT