Latest

सीनिअर्ससाठी चहा, नाश्ता, सिगारेट आणत होतो : यश

backup backup

मुंबई ः कधी कधी दिग्दर्शकांसाठी चहा, नाश्ता आणि सिगारेट आणण्यास मला सांगितले जात असे, असा खुलासा बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करणार्‍या केजीएफचा अभिनेता यशने एका मुलाखतीत केला आहे. यशने पुढे सांगितले की, अशी कामे सांगितल्याने माझ्या मनाला एकप्रकारे दुःख होत होते आणि मी स्वतःलाच विचारत असे की, हे सर्व करण्याची आवश्यकता आहे का? पण मला अपयशी होऊन घरी परत जावयाचे नव्हते. अशावेळी काही लोक हार मानतात, पण मी हार न मानता सक्षमपणे उभा राहिलो, कारण मला काहीतरी प्राप्‍त करावयाचे होते. सीनिअर अ‍ॅक्टर्ससोबत जेवणासाठी त्यांच्या टेबलवर बसलो असता ते मला करड्या नजरेने पाहात असत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT