पुढारी ऑनलाईन: बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहे. जानेवारीमध्ये कियारा व सिद्धार्थ लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे. आता सिद्धार्थ व कियाराच्या लग्नाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.
सिद्धार्थ- कियाराच्या एका जवळच्या मित्राने याचा खुलासा केला आहे. सिद्धार्थ- कियाराच्या लग्नाच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. मला सिद्धार्थ- कियाराच्या लग्नाबाबत कोणतीही माहिती नाही. मला किंवा कोणलाही अद्याप त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिकाही मिळालेली नाही. लग्न होत नाही आहे. हा कोणाच्या तरी स्वप्नातला लग्नसोहळा आहे, असे जवळच्या व्यक्तीने सांगितले. तो म्हणाला, सिद्धार्थ आणि कियारा एवढ्यात लग्न करणार नाही आहेत. जर हे सिक्रेट वेडिंग असेल, तर कदाचित ते फक्त त्या दोघांनाच माहीत असेल.