Latest

सानिया मिर्झा हिने कारकिर्दीत कमावले 60 कोटी रुपये

Arun Patil

नवी दिल्ली : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आपल्या व्यावसायिक टेनिस स्पर्धेच्या कारकिर्दीची सांगता केली. तिने मंगळवारी आपल्या कारकिर्दीचा शेवटचा सामना खेळला. 36 वर्षांची सानिया मिर्झा ही 2003 पासून व्यावसायिक टेनिस खेळत आहे. तिने आपल्या कारकिर्दीत एक एकेरी आणि 43 दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत. विशेष म्हणजे सानिया मिर्झाने आपल्या कारकिर्दीत तब्बल 72 लाख 61 हजार 296 डॉलर्स प्राईज मनी जिंकला आहे. याची रुपयात किंमत साधारणपणे 60 कोटी रुपयांच्यावर होते. ही माहिती महिला टेनिस असोसिएशनच्या वेबसाईटवरून घेण्यात आली आहे.

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाची महिला प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरसीबीने बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे. आरसीबी क्रिकेट संघाची मार्गदर्शक म्हणून मिळालेली ऑफरनंतर आपल्याला स्वतःला आश्चर्य वाटले होते, पण नंतर ही ऑफर स्वीकारल्याचे सानियाने म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT