Latest

सातारा : युवकाकडे सापडल्या दोन बंदुका; एलसीबीची कारवाई

Arun Patil

सातारा : पुढारी वृत्तसेवा : दोन गावठी पिस्टल व एक जिवंत राऊंड असा एकूण 1 लाख 80 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल बेकायदेशीर बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) युवकाला अटक केली. दरम्यान, एकाकडेच दोन बंदुका सापडल्याने खळबळ उडाली आहे. अल्तमेश हसन तांबोळी (वय 22, रा. मंगळवार पेठ, कराड जि. सातारा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्तमेश तांबोळी हा माजगांव फाटा ता. सातारा येथे गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. त्यानुसार एलसीबीने पथक तयार करून सापळा लावला. शनिवार दि. 20 रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास संशयित अल्तमेश हा माजगाव फाटा येथे आला. यावेळी पोलिसांनी त्याला पकडून त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे बंदुका सापडल्या. पोलिसांनी संशयिताकडून दोन देशी बनावटीची पिस्टल, एक जिवंत काडतुस व दुचाकी जप्त केली.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, फौजदार अमित पाटील, पोलिस उत्तमराव दबडे, तानाजी माने, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, संतोष पवार, अतिश घाडगे, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, गणेश कापरे, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाने, प्रविण पवार, मयुर देशमुख, मोहसीन मोमीण, संकेत निकम, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

SCROLL FOR NEXT