Latest

सातारा पालिका, मेढा नगरपंचायतीसाठी 5 कोटी मंजूर

दिनेश चोरगे

सातारा;  पुढारी वृत्तसेवा  :  मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सातारा पालिका हद्दीतील 23 आणि मेढा नगरपंचायत हद्दीतील 7 विकासकामे मार्गी लावण्यासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर करून घेतल्याची माहिती आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठीच्या योजनेतून 5 कोटी निधी उपलब्ध करून घेतला आहे. मेढा नगर पंचायतीला सातारा- महाबळेश्वर रोडलगत असणार्‍या रस्ता दुभाजकाला विद्युत पोलसह दिवे बसवण्यासाठी 40 लाख, याशिवाय बंदिस्त गटर बांधणे यासाठी 15 लाख, साकव बांधणे व रस्ता खडीकरण डांबरीकरण यासाठी 10 लाख, बौद्ध विहार येथे सामाजिक सभागृह बांधणे व सुशोभीकरण करणे 10 लाख, गोरे वस्तीलगत पिण्याच्या पाण्याची टाकी, बोअरवेल आणि वितरण व्यवस्था करणे आणि प्रभाग क्र. 16 मधील वृन्दावन कॉलनी येथे गटारावर स्लॅप बंदिस्त गटर करणे यासाठी 17 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

सातारा पालिका हद्दीतील गुरुवार पेठ बागेजवळ सांस्कृतिक भवन बांधणेसाठी 25 लाख, मंंगळवार पेठ अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते व पायर्‍या करण्यासाठी 35 लाख, शाहूपुरी हॉटेल सनडॉन ते अंबेदरे हद्दीपर्यंत डांबरीकरण व दोन्ही बाजूस गटर करणे, म्हसवे रोड, दत्त कॉलनी रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 20 लाख, म्हसवे रोड, भैरवनाथ कॉलनी ते अम्बर प्लाझा रस्ता व गटर करणेसाठी 12 लाख, शाहूपुरी यशवंत नगरमधील अंतर्गत रस्ते व गटर करणे 22 लाख, फॉरेस्ट कॉलनी येथे गार्डन, मुलांसाठी खेळणी व वॉकिंग ट्रॅक करणे 25 लाख, माची पेठ येथे संरक्षक भिंत बांधणे 35 लाख, मंगळवार पेठेतील झोपडपट्टी परिसरात पायर्‍या आणि काँक्रीट रस्ता करणे 13 लाख, सर्वोदय कॉलनी शाहूपुरी येथे बॅडमिंटन हॉल बांधणे 50 लाख, तामजाईनगर येथे विघ्नहर्ता कॉलनी रस्ता खडीकरण व दोन्ही बाजूस गेट करणे 10 लाख, झेंडा चौक भैरवनाथ पटांगण ते स्वागत कमान खडीकरण डांबरीकरण, गणेश भोसले ते कुंभार गिरण हायवे अखेर खडीकरण डांबरीकरण करणे 17 लाख, शाहूपुरी महालक्ष्मी कॉलनी सपकाळ घर ते समर्थ नगर कॉलनी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे 15 लाख, शाहूपुरी आझाद नगर येथे सांस्कृतिक भवन बांधणे 7 लाख, शनिवार पेठेत आप्पा गवळी घर ते खाटीक मशीद अखेर काँक्रीट करण्यासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

गुरुवार परज मशीद परिसर येथे काँक्रीटीकरण करणे 10 लाख, शाहूनगर आनंद कॉलनी ते बारटक्के घर अखेर खडीकरण, डांबरीकरण करणे 15 लाख, प्रतापगंज पेठेतील ओंकार भंडारे घर ते चिटणीस घर, लकेरी घर ते प्रेस अखेर पाईप ड्रेन करणे 15 लाख, सदरबझार येथे संदीप पवार घर ते गणपती मंदिर अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे 20 लाख, गोळीबार मैदान, साई सोसायटी, दत्त मंदिरासमोर सभामंडप बांधणेसाठी 15 लाख आणि पिरवाडी येथे बंदिस्त गटर व पाईप ड्रेन करण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT