Latest

सातारा : अल्‍पवयीन मुलाकडून घराशेजारील अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार

निलेश पोतदार

कुडाळ ; पुढारी वृत्‍तसेवा :  अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार : वाई तालुक्यातील एका गावात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या घरा शेजारील दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे वाई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार 

घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे त्याच बरोबर वाईच्या डीवायएसपी शितल जानवे यांनी रात्री उशिरा तत्काळ घटनास्थळी भेट दिली. पीडित मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे.

उपचारानंतर या अल्पवयीन मुलावर पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. संबंधित अल्पवयीन मुलाला आज (शुक्रवार) सातारा येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहितीही समोर येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT