Latest

सातारा : अजिंक्यतारा कारखाना चौथ्यांदा बिनविरोध

Shambhuraj Pachindre

सातारा : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्यातील सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रातील नावाजलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध झाली आहे.

शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची सन-2022-2023 ते 2027-2028 या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरु होती. महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम 2014 च्या नियम 32 मधील तरतुदीनुसार सत्ताधारी पॅनेलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ऊस उत्पादक सभासद गट क्र. -1 सातारामधून आ. शिवेंद्रराजे भोसले, नामदेव विष्णू सावंत, राजेंद्र भिकू घोरपडे हे बिनविरोध निवडून आले. व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक -2 नागठाणेमधून मोहनराव नथुराम साळुंखे, एकनाथ उर्फ सुनिल दत्तात्रय निकम, यशवंत हरी साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली.

व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक -3 अतितमधून शिवाजी रघुनाथ काळभोर, रामचंद्र रंगराव जगदाळे, बजरंग श्रीरंग जाधव, व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक-4 चिंचणेरमधून विश्वास रामचंद्र शेडगे, भास्कर एकनाथ घोरपडे, विजयकुमार आनंदराव घोरपडे, व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक -5 गोवेमधून सर्जेराव दिनकरराव सावंत, पांडुरंग आप्पाजी साबळे, नितीन भानुदास पाटील हे बिनविरोध झाले.

सातारा उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थामधून शशिकांत यशवंत साळुंखे, महिला राखीव मतदार संघातून विजया सत्पाल फडतरे आणि वनिता अशोक शेलार, इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून जयवंत रामचंद्र कुंभार, वि.जा.भ.ज./विमाप्र राखीव मतदार संघातून अशोक रामचंद्र कुराडे, अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघातून वसंत जगन्नाथ पवार हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT