Latest

सांगली : माडग्याळ गटात राजकीय समिकरणे बदलली

Arun Patil

माडग्याळ ; वसंत सावंत : जिल्हा परिषद गटाच्या प्रारुप रचनेत माडग्याळ जिल्हा परिषद गटातील राजकीय गणिते बदलली आहेत. या गटात अनेक गावे नव्याने समाविष्ट झाली आहेत. यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. मात्र आरक्षण निश्‍चितीनंतरच खर्‍याअर्थाने चित्र स्पष्ट होणार आहे.

माडग्याळ जिल्हा परिषद गटात माडग्याळ व दरिबडची हे दोन पंचायत समिती गण आहेत. माडग्याळ गणात माडग्याळ, व्हसपेठ, राजोबाचीवाडी, कोळगिरी, वळसंग, अमृतवाडी ही गावे आहेत. दरिबडची गणात दरिबडची, गुड्डापूर, सोरडी, आसंगी, तिल्याळ ही गावे आहेत.

आधीच्या जाडरबोबलाद जि. प. गटातील जाडरबोबलाद, उटगी, सोन्याळ, लकडेवाडी ही गावे वगळली आहेत. यामुळे त्या गावातील अनेक इच्छुक हिरमुसले आहेत. तर आता नवीन चेहर्‍याला संधी मिळावी, अशी मागणी युवकांतून होत आहे.

दरम्यान, आता माडग्याळ जि. प. गटात इच्छुकाची संख्या वाढली आहे. काँग्रेसकडून जि. प. सदस्य सरदार पाटील, सोसायटीचे माजी अध्यक्ष पांडुरंग निकम, माजी सरपंच सुरेश ऐवाळे, माजी पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, सुनील सोनवणे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जि. प. साठी विजय हाके, माजी पंचायत समिती सदस्य सोमन्ना हाके इच्छुक आहेत. भाजपकडून डॉ.सार्थक हिट्टी, बाजार समिती संचालक विठ्ठल निकम, आनंदराव पाटील, पदवीधर संघटनेचे सचिन निकम इच्छुक आहेत. डॉ. तुकाराम सावंत, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी सुरू केली आहे.

माडग्याळ गणात काँग्रेसकडून सरपंच इरान्ना जत्ती, डॉ. प्रकाश सावंत, व्हसपेठचे सरपंच राम साळुंखे, दत्ता बंडगर हे तयारी करीत आहेत. भाजपकडून कामान्ना बंडगर इच्छुक आहेत. विक्रम ढोणे समर्थक राहुल तांबे हेपण अपक्ष म्हणून लढण्याची तयारी करत आहेत.

दरीबडची पंचायत समितीसाठी काँग्रेसकडून गुड्डापूर येथील युवक नेते गणी मुल्ला, दरीबडची ग्रामपंचायत सदस्य अमोगसिद्ध शेंडगे, माजी उपसरपंच शिवानंद माळी, उपसरपंच रमेश मासाळ इच्छुक आहेत. भाजपाकडून माजी सरपंच सिद्दू माळी इच्छुक आहेत.
दरम्यान, आतापासून इच्छुकांनी लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. संपर्क वाढवित आहेत. मात्र आरक्षण अजून जाहीर झालेले नाही. मात्र इच्छुक उमेदवार पायाला भिंगरी बांधून लोकांना भेटत असल्याचे चित्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT