Latest

सांगली : दिघंचीत घरफोडी;17 लाखांचा मुद्देमाल लंपास

backup backup

दिघंची; पुढारी वृत्तसेवा : दिघंची (ता.आटपाडी) येथील कैलास हणमंत यादव यांचे राहते घर फोडून चोरट्यांनी 28 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अडीच लाख, असा सुमारे 17 लाखाचा मुद्देमाल लंपास केला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घटनेची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दिघंची येथे कैलास यादव यांचे घर आहे. त्यांच्या घरातील एका खोली च्या खिडकीचे ग्रिल कापून चोरट्यांनी खोलीमध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील 28 तोळे सोन्याचे दागिने व रोख अडीच लाख रुपये, असा एकूण 17 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे.

सदर घटना कळताच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अजय सिंधकर, सचिन कनप, जितेंद्र जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. यावेळी काही ठराविक अंतरावर जावून श्वान घुटमळले. या घटनेची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.

आटपाडी तालुक्यातील चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याने आटपाडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT