Latest

सांगली : जिल्ह्यात 27 हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने जिल्ह्यात रविवारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाचवीच्या 17 हजार 210 तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आठवीच्या 10 हजार 758 अशा एकूण 27 हजार 968 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेला 1 हजार 574 विद्यार्थी अनुपस्थित होते. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे ही परीक्षा पार पडली.

दि. 20 जुलैरोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र राज्यात त्या कालावधीत संततधार पाऊस पडत होता. परिणामी विद्यार्थ्यांना परीक्षेस येण्यास अडचणी येण्याची शक्यता ग्रहीत धरून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

जिल्ह्यात इयत्ता 5 वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विविध भागात 131 केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी 18 हजार 128 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 17 हजार 210 म्हणजेच 94.91 टक्के विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला हजर राहिले तर 918 विद्यार्थी अनुपस्थित होते. या परीक्षेसाठी सर्वांधिक विद्यार्थी तासगाव तालुक्यात हजर होते, तर सर्वात कमी उपस्थिती सांगली महापालिका क्षेत्रात होती.

इयत्ता 5 वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी तालुकानिहाय नोंदणीकृत विद्यार्थी आणि कंसात उपस्थित विद्यार्थी असे ः मिरज- 2255 (2140) , तासगाव- 2185 (2110) , वाळवा- 3149 (2989), खानापूर- 1195 (1136), शिराळा-1276 (1228), कवठेमहांकाळ- 1226 (1161) , जत- 2180 (2048), आटपाडी- 855(809), पलूस- 907 (866), कडेगाव- 958 (919), सांगली महापालिका
क्षेत्र 1942 (1804).

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 85 केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. या परीक्षेसाठी 11 हजार 410 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. मात्र प्रत्यक्षात 10 हजार 758 म्हणजेच 94.29 टक्के विद्यार्थी परीक्षेस हजर होते. इयत्ता 8 वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी तालुकानिहाय नोंदणीकृत विद्यार्थी आणि कंसात उपस्थित विद्यार्थी पुढीलप्रमाणे ः मिरज- 1054 (980) , तासगाव- 1482 (1426), वाळवा- 2001 (1914), खानापूर- 796 (753), शिराळा- 807 (781), कवठेमहांकाळ- 632 (576), जत-1543 (1442), आटपाडी-571 (533), पलूस- 657 (629), कडेगाव- 626 (599), सांगली महापालिका क्षेत्र-1241 (1125).

जिल्ह्यातील सर्वच केंद्रांमध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली. नोंदणीकृत संख्येत उपस्थिती विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक होती.
– मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प.

SCROLL FOR NEXT