Latest

सांगली : जि.प., पं. समिती, पालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार

अमृता चौगुले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पंधरा दिवसांत जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, दहा पंचायत समिती आणि इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा या चार मुदत संपलेल्या नगरपालिकांचा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महापालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्या होत्या. मंत्री मंडळाच्याच्या बैठकीनंतर सांगली जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 60 वरून 68 होणार, तर पंचायत समितीची सदस्य संख्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यामागे 2 या प्रमाणे 136 होणार होती. त्याबाबतची अधिसूचनाही निघाली होती. परंतु राज्य सरकारने केलेला कायदा न्यायालयाने फेटाळून लावत जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले.

इस्लामपूर, आष्टा, तासगाव आणि विटा पालिकेचाही कार्यकाल संपला होता. परंतु कोरोनामुळे नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे नवे कारभारी सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

SCROLL FOR NEXT