Latest

सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी जोडपं

Shambhuraj Pachindre

बॉलीवूडमधील लाडक्या जोडप्यांमध्ये दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह यांचा समावेश होतो. आता हे जोडपं आशियातील चार सर्वात श्रीमंत सेलिबि—टी जोडप्यांमधीलही एक जोडपे बनले आहे. हाँगकाँगचे प्रसिद्ध अभिनेते टोनी लेउंग आणि कॅरिना लाऊ, दक्षिण कोरियाचे सुपरस्टार रेन आणि किम ताए-ही, तसेच सिंगापूरचे फॅन वोंग आणि ख्रिस्तोफर ली हे या यादीत स्थान मिळवलेले अन्य तीन पॉवर कपल्स आहेत. दीपिका आणि रणवीरने 2018 मध्ये लग्‍नगाठ बांधली. चित्रपटांव्यतिरिक्‍त दोन्ही सेलिबि—टी ब—ँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियाद्वारे कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. दोघांची एकूण संपत्ती सुमारे 445 कोटी रुपये आहे. रिपोर्टसनुसार दीपिका ब—ँड एंडोर्समेंटमधून सुमारे 78 कोटी रुपये कमावते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT