Latest

सर्पदंश करवून प्रियकराचा काढला कायमचा काटा

Arun Patil

नैनिताल, वृत्तसंस्था : प्रेम हे एक पवित्र नाते आहे. प्रेमात पडलेले युगुल एकमेकांसाठी जीवही देण्यास तयार असतात, मात्र उत्तरखंडमध्ये असे काही घडले आहे की, प्रेम करावे की नाही, असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. प्रियकराचा पिच्छा सोडविण्यासाठी प्रेयसीने चक्क सर्पदंश (कोब्रा) करवून त्याचा कायमचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सर्पदंश करणार्‍या गारुड्याला पोलिसांनी अटक केली आहे तर प्रेयसीसह चौघे जण फरार झाले आहेत.

15 जुलै रोजी नैनितालमधील एक रस्त्यावर मोटारीत तरुण व्यावसायिक अंकित चौहान याचा मृतदेह पोलिसांना सापडला. मोटारीतील गॅस लिकमुळे अंकितचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना होता, मात्र त्याचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. अंकितच्या मोबाईल कॉल तपासल्यानंतर माही आणि डाली नावाच्या तरुणीबरोबर सातत्याने त्याचे बोलणे होत असल्याचे समोर आले. चौकशीसाठी घरी पोहोचल्यानंतर माही फरार झाली असल्याचे समजले.

माही अंकितची गर्लफ्रेंड होती. ती आपल्या मित्राच्या मदतीने अंकितला ब्लॅकमेल करत होती. मृत्यूपूर्वी अंकित माहीला भेटायला गेला, मात्र त्यानंतर त्याचा मृतदेह मिळाला. माहीचे फोन कॉल तपासल्यानंतर रमेशनाथ नावाच्या संशयिताचा नंबर सापडला. मी गारुडी असून माहीने एका व्यक्तीची ओळख करून दिली आणि कालसर्प योगाची पूजा करण्यासाठी सापाची गरज असल्याचे मला सांगितले, असे रमेशनाथ याने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT