Latest

शेवटचे दोन सामने अमेरिकेतच; भारतीय संघाला मिळाला व्हिसा

दिनेश चोरगे

सेंट किटस् : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचे दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने अमेरिकेत होणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले. खेळाडूंना अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्याने आगामी दोन सामन्यांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते; परंतु आता भारत आणि वेस्ट इंडिज संघाच्या सर्व सदस्यांना अमेरिकेला जाण्यासाठी अधिकृतपणे मंजुरी देण्यात आल्याची बातमी आली आहे.

रोहित शर्मा आणि कंपनीला फ्लोरिडा सामन्यांसाठी व्हिसा मिळाला आहे. रविचंद्रन अश्‍विन फ्लोरिडाला पोहोचला आहे. रोहित शर्मा, राहुल द्रविड, संजू सॅमसन आणि इतर 11 जणांकडे अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा नव्हता; मात्र आता संपूर्ण टीमला व्हिसाची मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच टी-20 मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना फ्लोरिडामध्येच खेळवला जाईल.

वेस्ट इंडिजचा संघ आधीच अमेरिकेत पोहोचला आहे. ज्या खेळाडूंकडे व्हिसा नव्हता. त्यांना गयाना येथील अमेरिकन मुलाखतीसाठी पाठवण्यात आले होते.

SCROLL FOR NEXT