Latest

शेवग्याच्या शेंगा : शेवग्याच्या शेंगांमध्ये पोषक घटकांचा खजिना

Arun Patil

नवी दिल्ली : शेवग्याच्या शेंगेमध्ये अनेक पोषक घटक, औषधी गुणधर्म असतात. फक्त शेवग्याच्या शेंगा नाहीत तर त्याच्या पानांची भाजी देखील बनवण्यात येते. शेवग्याच्या शेंगेत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, पोटॅशियम आणि आयरन मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अशा शेंगांचे किंवा भाजीचेही सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी शेवग्याची शेंग लाभदायक ठरू शकते. यात असलेले मॅग्नेशियम रक्तवाहिन्या निरोगी बनवण्याचे काम करते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब वाढत नाही. शेवग्याची शेंग खाल्ल्याने त्वचेला अनेक फायदे होतात. कारण शेवग्याच्या शेंगेत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि फॉलिक अ‍ॅसिडसारखे पोषक घटक आढळतात. शेवग्याच्या शेंगेमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. यामध्ये असलेले पोषक तत्त्व मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात.

शेवग्याच्या शेंगेचेे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. शेवग्याच्या शेंगेमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. शेवग्याची शेंग खाल्ल्याने अंगदुखी आणि सूज येण्याची समस्या दूर होते. शेवग्याच्या शेंगेमध्ये आढळणारे पोषक घटकांमुळे हृदयाला अनेक फायदे होतात. शेवग्याच्या शेंगेच्या झाडाच्या पानामध्ये बायोअ‍ॅक्टिव्ह संयुगेचे गुणधर्म असतात. हे खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका दूर राहतो.

SCROLL FOR NEXT