Latest

शिवरायांवरील चित्रपटांना मिळणार एक कोटीचे अनुदान

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी चित्रपटांना दुप्पट अनुदान देण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहर्काय़ांवरील प्रेरणादायी मराठी चित्रपटांना एक कोटी आणि त्याहून अधिक अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली.

उद्धव ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांनी मराठी चित्रपटांच्या अनुदानासंदर्भातील तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. सरकार अनुदान देण्यात विलंब करत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या आमदारांनी केला. यावर, २०२० ते २०२२ या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनुदानासाठी अर्ज करण्यात आलेल्या ३९२ चित्रोटांपैकी एकाही चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे त्याकाळात परिक्षणच न झाल्याने स्वाभाविकपणे नंतर विलंब झाला. ४९ जणांची जम्बो समिती असूनही मविआ काळात एकाही चित्रपटाचे परिक्षण झालेले नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

आमच्या सरकारच्या काळात अनुदान तीन महिन्यात वितरीत करण्यात येईल. त्यासाठीची चौकट निश्चित केली आहे. आता चित्रपटांना तीन महिन्यांच्या आत अनुदान दिले जाईल. या अनुदानासाठी दोन वर्षांच्या आतल्याच चित्रपटाने अर्ज करावा यासाठी चौकट आखली जात आहे. अनुदानासाठी चित्रपटांची निवडीसाठी आवश्यक परीक्षणासाठी सध्या एकच चित्रपटगृह आहे. आता आणखी एक चित्रपटगृह सुरू करण्याचे काम सुरू आहे. जाईल परिणामी अनुदानाच्या प्रक्रियेला गती मिळेल, असेही मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT