Latest

शारदीय नवरात्र : श्री अंबाबाई देवीची आज गजारुढ अंबारीतील पूजा!

रणजित गायकवाड

कोल्हापूर : पुढारी वृतसेवा

शारदीय नवरात्रोत्सव पार पडत आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची आजची पूजा हत्तीवर बसून त्र्यंबोली देवीच्या भेटीला जातानाची आहे. त्याला गजारुढ अंबारीतील पूजा असेही म्हणतात. देवीचं नेत्रदीपक रूप भक्तगण डोळ्यात साठवण्यासाठी लगबग करत आहेत.

आज ललिता पंचमी.. कोल्हापुरात हा दिवस खास असतो. कारण स्वतः करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवी त्र्यंबोली देवीला भेटायला जाते. वर्षानुवर्षे हा सोहळा साजरा केला जात आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज गजारूढ रूपातील पूजा बांधण्यात आली.

अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे…

देव आणि दानव यांच्या युद्धामध्ये कामाक्ष राक्षसाने आपल्या योगदंडाच्या बळावर सर्व देवांना शेळ्या-मेंढ्या बनवले होते.देवी त्र्यंबोलीने ( टेंबलाई ) आपल्या चतुराईने कामाक्षा कडील योग दंड काढून घेऊन देवांना पूर्ववत केले व कामाक्षा बरोबर युद्ध करुन त्याचा वध केला. त्या विजया प्रित्यर्थ श्री महालक्ष्मी ( अंबाबाई ) ने विजय सोहळा आयोजित केला. परंतु या सोहळ्याचे त्र्यंबोली देवीला आमंत्रण द्यायचे राहून गेले.त्यामुळे सखी देवी त्र्यंबोली रुसुन पुर्वेकडील टेकडीवर जाऊन बसली. महालक्ष्मी ( अंबाबाई ) च्या हे लक्षात आल्यावर ती त्र्यंबोली देवी चा रुसवा काढण्यासाठी आजच्या ललिता पंचमी दिवशी तिला भेटायला गेली व तिचा रुसवा काढून दोघींची हृद्य भेट झाली. आजची पूजा हत्तीवर बसून त्र्यंबोली देवीच्या भेटीला जातानाची आहे. ही पूजा श्रीपूजक अरुण मुनिश्वर, विद्याधर मुनिश्वर, आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली.

SCROLL FOR NEXT