Latest

शवपेटीतून आला, अन् बोहल्यावर चढला..!

Arun Patil

न्यूयॉर्क : लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो. तो संस्मरणीय करण्यासाठी कोण कसली शक्कल लढवेल याचा अंदाज बांधणे केवळ अशक्य. त्यामुळे सगळ्यांच्या या अतरंगी तर्‍हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. नवरदेव नवरीच्या एंट्रीवर स्मोकरचा धूर सोडून स्वर्गात असल्याचा भास निर्माण केला जातो. काही लोक हीरो-हीरोइन सारखी वरून कुठून तरी एंट्री करतात. तसेच काही हेलिकॉप्टरमधून लग्नमंडपात एंट्री करतात.

अमेरिकेतील या पठ्ठ्याने मात्र कहरच केला. हा नवरदेव चक्क शवपेटीतून आपल्या लग्न मंडपात पोहोचला. जिथे लग्नाला मंगलकार्य मानले जाते तिथे मृत्यूच्या अशुभ यात्रेचे स्वरूप देण्याचे धाडस या नवर्‍यामुलाने केले. त्यामुळे या सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना चक्कर यायचेच काय ते बाकी उरले होते. याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सुमारे 82 लाख लोकांनी तो पाहिला आहे.

SCROLL FOR NEXT