Latest

व्हॉटस्अ‍ॅपद्वारे फोटो ब्लर करून पाठवू शकता

Arun Patil

नवी दिल्ली : आपल्या यूझर्ससाठी व्हॉटस्अ‍ॅप सातत्याने अपडेट देते. एखादे फिचर्स अपडेट करण्यापूर्वी कंपनीकडून बीटी व्हर्जन चाचणी केली जाते. आता व्हॉटस्अ‍ॅप एक नवीन फिचर जारी करण्याच्या तयारीत आहे.तुम्ही एखादा फोटोे व्हॉटस्अ‍ॅपद्वारे पाठवत असताना तो ब्लर करून पाठवू शकणार आहात.

कंपनी एका ड्रॉईंग टूलवर काम करत असून त्याच्या मदतीने तुम्ही कोणताही फोटो ब्लर करून पाठवू शकता. व्हॉटस्अ‍ॅपच्या या नवीन फिचरची सध्या बीटा चाचणी घेतली जात आहे. कंपनीने या फिचर बीटा यूजर्सना रीलिज करण्यास सुरुवात केली आहे.त्याचा स्क्रीन शॉट समोर आला आहे.

यामध्ये यूजर्सला कोणताही फोटो शेअर करताना तो एडिट करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. या ऑप्शनमुळे संपूर्ण फोटो अथवा फोटोचा ठराविक भाग ब्लर करता येणार आहे. यासाठी व्हॉटस्अ‍ॅपने दोन ब्लर टूलचे ऑप्शन दिले आहेत. गरजेनुसार यूजर्स या टूलचा वापर करू शकणार आहेत. सध्या याचे बीटा व्हर्जन आले आहे, मात्र त्याचे कायमचे (स्टेबल) व्हर्जन कंपनी कधी जारी करणार आहे, याची तारीख निश्चित झालेली नाही.

SCROLL FOR NEXT