Latest

व्हॉटस्अॅप व्हिडीओ कॉलद्वारे महिलेची प्रसूती 

दिनेश चोरगे

जम्मू वृत्तसंस्था : जम्मू-काश्मिरात मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव सुरू असून रस्ते बंद असल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच डॉक्टरांनी एका महिलेची प्रसूती व्हॉटस्अॅप व्हिडीओ कॉलद्वारे करण्यात आली. महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर सीएचसी या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मेडिकल कॉलेजमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

हिमवर्षावामुळे मेडिकल कॉलेजकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद होते. यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी त्या महिलेची डिलिव्हरी व्हिडीओ कॉलद्वारे सीएचसीमध्ये केली. कुपवाडामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिमवर्षाव होत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

SCROLL FOR NEXT