Latest

वाशीम : खताच्या गोणीत मानवी सांगाड्याचे तुकडे आढळल्याने परिसरात खळबळ

अमृता चौगुले

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील मालेगाव शहराच्या उत्तरेस जुन्या इरळा रस्त्यालगत असलेल्या एका शेताच्या धुऱ्याजवळ खताच्या गोणीत मानवी सांगाड्याचे तुकडे आढळून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदरची बाब आज, शुक्रवारी (दि.१९) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास शहराच्या उत्तरेला असलेल्या शेताच्या धुऱ्याजवळ खताच्या गोणीत मानवी सांगाड्याचे तुकडे दिसले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तडसे, सारिका नारखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवी सैबेवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास कोकाटे, प्रशांत वाढनकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, जितू पाटील, विलास पवार, नायब उपनिरीक्षक एस. पोलीस हवालदार आशिषभाऊ बिडवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस पथकाने पंचांसमोरील खताच्या गोणीतून मानवी सांगाड्याचे तुकडे जप्त केले आहेत. पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT