Latest

वायुसेना हॅलिकॉप्टर : कोल्हापुरात इमर्जन्सी लँडिंग

अमृता चौगुले

उजळाईवाडी; पुढारी वृत्तसेवा : बेळगावहून मुंबईला जाणार्‍या भारतीय वायुसेनेच्या ( वायुसेना हॅलिकॉप्टर ) 'एमआय 8' हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते कोल्हापूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सकाळी 11.55 वाजता हा प्रकार घडला. वायुसेनेचे नऊ अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करीत होते. हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यामुळे दुर्घटना टळली.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे संपूर्ण देशाला धक्का बसला असून, अद्याप भारतीय लोक हे विसरू शकले नाहीत. भारतीय वायुसेनेच्या अधिकार्‍यांचे हेलिकॉप्टर ( वायुसेना हॅलिकॉप्टर ) बेळगावहून मुंबईकडे जाण्यासाठी सकाळी सव्वाअकरा वाजता टेक ऑफ झाले. मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक हेलिकॉप्टरच्या टेल रोटर गिअर बॉक्समध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हेलिकॉप्टर चालकाने 11 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळ एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधत हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडाची माहिती दिली. काही क्षणांतच कोल्हापूर विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांच्या टीमने भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला ग्रीन सिग्नल देऊन विमानतळावरील फायर बि—गेडसह सर्व यंत्रणा विनाविलंब सज्ज ठेवली.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे कर्मचारी, महाराष्ट्र पोलिस, एम.एस.एफ. जवान, अ‍ॅम्ब्युलन्स अशी सर्व यंत्रणा सतर्क झाली. 11 वाजून 55 मिनिटांनी वायुसेनेचे हेलिकॉप्टरचे ( वायुसेना हॅलिकॉप्टर ) सुरक्षितपणे विमानतळावर लँडिंग झाले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वायुसेनेच्या जवानांनी झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त केला आणि दोन तासांनंतर दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी हेलिकॉप्टरचे मुंबईला टेक ऑफ झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT