Latest

वाठारजवळ गावठी पिस्तूल, अमली पदार्थ जप्त; 3 अटकेत

Arun Patil

पेठवडगाव ; पुढारी वृत्तसेवा : वडगाव-वाठार रस्त्यावरून भरधाव जाणार्‍या मोटारसायकलचा पाठलाग करून तिघा तरुणांकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी मनोज राजेंद्र खांडेकर (वय 20), अविनाश सतीश इंगळे (19), आशितोष दिलीप साठे (19, सर्व, रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड, जि. सातारा) या तिघांना वडगाव पोलिसांनी अटक केली.

वडगाव पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक शनिवारी पहाटे गस्त घालत असताना वडगावहून वाठारच्या दिशेने भरधाव विनानंबरची मोटारसायकल जात होती. संशयावरून पाठलाग करून वाठारजवळील सिमेंट फॅक्टरीजवळ पकडले.

तिघांची झडती घेतली असता एक गावठी बनावटीचे पिस्तूल, अमली पदार्थांच्या गांजाच्या दोन पुड्या, मोबाईल, चिलीम, मोटारसायकल असा एकूण 90 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिघांना वडगाव न्यायालयात हजर केले असता 13 जून पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT