Latest

लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह

Arun Patil

मॉस्को : युक्रेन आणि रशियात यांच्यात गेले पाच महिने भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धजन्य स्थितीमध्येच रशिया सध्या असे एक लेजर शस्त्र विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे की, ते अंतराळात कार्यरत असलेल्या रशियन उपग्रहांना (सॅटेलाईटस्) जगापासून चक्क लपवण्याचे काम करणार आहे.

'स्पेस रिव्ह्यू'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात या लेजर शस्त्राची माहिती देण्यात आली आहे. या तंत्रज्ञाच्या मदतीने देशाच्या गुप्तचर उपग्रहांच्या 'ऑप्टिकल सेन्सर्स'ला लेजर लाईटने कव्हर केले जाणार आहे. सध्या लेजर तंत्रज्ञान इतके अद्ययावत झाले आहे की, जगातील बहुतेक देश या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या उपग्रहांना लपवण्यास प्राधान्य देण्याचा विचार करत आहेत.

रशियाला हे तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले, तर हा देश अवकाशात कार्यरत असलेल्या आपल्या सर्व उपग्रहांना दुसर्‍या देशांच्या नजरेपासून बचाव करू शकणार आहे. या लेजर तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यात असे लेजर शस्त्र तयार करण्यात येऊ शकेल की, त्यांच्या मदतीने अवकाशात कार्यरत असलेल्या शत्रू देशांच्या उपग्रहांना अकार्यक्षम करणे शक्य होईल. अशा रितीने रशिया अवकाशातील आपल्या उपग्रहांचे भविष्यात संरक्षण करू शकणार आहे.

दरम्यान, जगात पहिले लेजर 1960 मध्ये विकसित करण्यात आले होते. त्यानंतर आजतागायत यावर अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात आला आहे. सध्या या तंत्रज्ञानाचा जगभरात वापर करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT