Latest

रेल्वे पुलावर रिल्स बनविणे जीवावर बेतले!

Arun Patil

पाटणा, वृत्तसंस्था : बिहारच्या खगरियात रेल्वे पुलावर रिल्स तयार करणार्‍या 2 मित्रांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला. तिसर्‍या मित्राने पुलावरून सुखी नदीत उडी मारल्याने तो बचावला. हे तिघेही रेल्वे ट्रॅकवर रिल्स तयार करत होते. तीन रिल्स या मुलांनी इन्स्टावर अपलोडही केल्या होत्या.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी या तिघांनी '2022 में औकात दिखाने वालों 2023 में बचकर रहना', या गाण्यासह एक रील इन्स्टावर अपलोड केली आणि यानंतर मोजून पंधराव्या मिनिटाला त्यांना रेल्वेने उडवले. तिघे 15 ते 17 वयोगटातील आहेत. नितीश कुमार व सोनू कुमार हे दोघे या घटनेत मरण पावले; तर अमन कुमार हा वेळीच उडी घेतल्याने बचावला. सोनू हा आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता.

SCROLL FOR NEXT