Latest

‘रॅकून’ कुत्र्यामुळे बळावला कोरोनाचा प्रादुर्भाव; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

दिनेश चोरगे

वुहान : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करणार्‍या जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लाभार पथकाने एका डेटाचे विश्लेषण केले आहे. या डेटाच्या संदर्भात चिनी संशोधकांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता याच मुद्द्याच्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेने चीनला फटकारले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रसाराचे मूळ शोधण्याच्या कामात व्यत्यय निर्माण केल्याप्रकरणी डब्लूएचओ या संघटनेने चिनी अधिकार्‍यांना फटकारले, अशी माहिती 'द न्यूयॉर्क टाईम्स'ने दिली आहे. 3 वर्षांपूर्वीचा डेटा न देण्याचे कारण आणि आता जानेवारीत ऑनलाईन प्रकाशित केल्यावरही ते का मिळू शकत नाही याची विचारणा चिनी अधिकार्‍यांकडे केली. इंटरनेटवरून हा सारा डेटा गायब होण्यापूर्वीच विषाणूतज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने तो डाऊनलोड केला आणि त्याचे विश्लेषण सुरू केले होते.

या विश्लेषणाच्या आधारे असे निदर्शनास आले की, बेकायदेशीररीत्या खरेदी-विक्री केल्या जाणार्‍या 'रॅकून' कुत्र्याच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव बळावला. चीनच्या वुहान हुआनान येथील होलसेल मासळी बाजारातून मानवी संसर्ग आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला, असा कयास विश्लेषकांनी व्यक्त केला; मात्र डेटाबेसमधून जीन्सचा अनुक्रम हटवल्यामुळे ते अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत.

डब्लूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अदनाम घेब्रेयसस म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी हा डेटा शेअर करता आला असता. किंबहुना तो करायला हवा होता. तथापि, रॅकून या जातीचे कुत्रे, लांडगा यासारख्या प्राण्यांनी वुहान बाजारातच आपले डीएनए मागे ठेवले होते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT