Latest

राज्यातील २३ वाघांसह देशात ८६ वाघांचा मृत्यू

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : जानेवारी ते जुलै 2021 या कालावधीत देशात एकूण 86 वाघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिली आहे, तर याच कालावधीत राज्यात विविध कारणांनी 23 वाघांचा मृत्यू झाल्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

राज्यात मृत्यू पावलेल्या 23 वाघांपैकी 15 वाघांचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला आहे. रेल्वे अपघातात 1 वाघ मृत्युमुखी पडला. विष प्रयोगामुळे 4 वाघांचा मृत्यू झाला आहे, तर 2 वाघ शिकार्‍यांच्या गोळीला बळी पडले.

विजेच्या तारेचा धक्‍का बसून एका वाघाला जीव गमवावा लागला आहे. मृत्यू पावलेल्या वाघांपैकी 8 बछड्यांचा आणि 15 वयस्क वाघांचा समावेश आहे.

उमरेड पवनी करहांडला येथे अभयारण्यात एक वाघ आणि तीन बछड्यांना विषप्रयोग करून मारण्यात आले. यासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

दोन वाघांची शिकार करणार्‍या पांढरकवडा नव विभागातील मुकुटबन वनक्षेत्रातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी आणखी पाच जणांना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना न्यायालयाने जामिनावर सोडले आहे.

* वन्यप्राण्यांचा मागोवा घेणे, कॅमेरा ट्रॅप लावणे, एसटीपीएफ पथकाद्वारे गस्त घालणे, गुप्त सेवा निधी उपलब्ध करून देणे, विद्युत ट्रीपिंग वर लक्ष ठेवणे.

* व्याघ्र आणि इतर वन्य प्राण्यांच्या शिकारीला आळा घालण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत.

* पाणस्थळाची तपासणी, जंगलालगत विहिरीला कठडे बांधणे, जंगलात येणार्‍या-जाणार्‍या व्यक्तींची नोंद घेण्याकरिता रजिस्टर ठेवणे या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहितीही भरणे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT