Latest

रत्नागिरी : रोहा-चिपळूण ‘मेमू’ गणपती स्पेशल धावणार 12 डब्यांची

दिनेश चोरगे

रत्नागिरी;  पुढारी वृत्तसेवा : या वेळच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोकण रेल्वे मार्गावर रोह्याच्या पुढे प्रथमच धावणार्‍या मेमू ट्रेनला अतिरिक्‍त चार डबे जोडून चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्‍या भाविकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

आधी ही गाडी आठ डब्यांची जाहीर करण्यात आली होती. दि. 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट, 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर व 10 ते 12 सप्टेंबर 2022 या दिवशी रोहा- चिपळूण मेमू विशेष गाडी सोडली जाणार आहे.
गणेशोत्सवासाठी रोहा-चिपळूण मेमू गाडी आधीच्या दिवा-रोहा गाडीला विस्तारित करुन चालवली जाणार आहे. यामुळे प्रत्यक्षात ही दिवा- रोहा-चिपळूण अशी धावणार आहे. या बाबत माहितीनुसार 01347 दिवा -रोहा मेमू सकाळी 8.45 ला सुटून सकाळी 11:05 ला रोहा येथे पोहोचेल. तीच गाडी पुढे 01157 रोहा- चिपळूण मेमू म्हणून सकाळी 11.05 ला सुटून चिपळूणला दुपारी 1.20 ला पोहोचेल.
01158/01348 चिपळूण -रोहा -दिवा मेमू दुपारी 1.45 ला सुटून संध्याकाळी 4.10 ला रोहयाला पोहोचेल. तीच पुढे 01348 रोहा दिवा मेमू म्हणून रोहा येथून 4.15 ला सुटेल व दिव्याला संध्याकाळी 6.45 ला पोहोचेल.

दिवा- चिपळूण मार्गावर धावताना मेमू विशेष रेल्वे गाडी दातिवली, निळजे, तळोजे, नावडे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, खेड या स्थानकांवर थांबे घेणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT