Latest

युक्रेनचे युद्धात 50 खेळाडू शहीद

Arun Patil

कीव्ह ; वृत्तसंस्था : रशियाने युक्रेनवर (Ukraine Russia War) केलेल्या हल्ल्यात मोठ्या संख्यने युक्रेनचे नागरिक मारले गेले असून अजूनही रशियाचे हल्ले सुरूच आहेत. दरम्यान, युद्धाला सुरुवात झाल्यापासून युक्रेनचे 50 खेळाडू युद्धआघाडीवर शहीद झाल्याचे समोर आले आहे. देशाची गरज ओळखून या खेळाडूंनी शस्त्र हाती घेऊन युद्धात सक्रिय सहभाग नोंदवला होता. युक्रेनचे युवा आणि क्रीडा मंत्री वादिम गुटजितो यांनी रविवारी ही माहिती दिली.

गुटजितो म्हणाले, बलिदान दिलेले खेळाडू युक्रेनसाठी विविध खेळ खेळत होते. यातील अनेकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेनचे प्रतिनिधित्व केले होते. या खेळाडूंच्या मृत्यूनंतरही आजही अनेक खेळाडू युक्रेनसाठी युद्ध लढत आहेत. युक्रेनच्या सैन्यात काम करत आहेत. प्रत्येक खेळाडूने दिलेल्या बलिदानाला आमचे नमन. त्यांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात खेळाडू शहीद होऊनही खेळाडूंचा उत्साह कमी झालेला नाही. (Ukraine Russia War)

ऑलिम्पिकची तयारी 

गुटजितो म्हणाले की, सध्या बहुतांश खेळांमध्ये प्रशिक्षणासाठी कोणतीही विशेष सुविधा शिल्लक राहिलेली नाही. त्यातूनच काही खेळाडू सध्या सैन्यात कार्यरत असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तयारीही करत आहेत. यूरोपीय चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक 2024 साठी आमचे खेळाडू तयारी करत आहेत.

बहुतांश खेळाडू युक्रेनमध्येच तयारी करत असून काहीजण परदेशातही प्रशिक्षण घेत आहेत. आम्ही एक प्रस्ताव मंजूर केला आहे. यात प्रत्येक खेळाडूला डॉक्टर, मालीश करणारा आणि हाय-प्रोफाईल प्रशिक्षक देण्याची खात्री दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT