Latest

‘या’ शेअरमध्ये वर्षभरात २० टक्क्यांची वाढ, गुंतवणूक करायला हरकत नाही

मोहन कारंडे

डॉ. वसंत पटवर्धन 

यावेळी 'चकाकता हिरा' म्हणून 'भारत फोर्ज' या कल्याणी समूूहातील कंपनीचा परामर्श घेतला आहे. कल्याणी हे मूळचे कराडचे मोठे शेतकरी कुटुंब. त्यांचा कुक्कुटपालनाचा मोठा व्यवसाय होता. शिवाय त्यांची सांगलीलाही हळदीची खूप मोठी पेवे होती. तिथून त्यातील 2 भावांपैकी एका भावाने उद्योग क्षेत्रात यावे यासाठी शंतनुराव किर्लोस्कर यांनी त्यांचे मन वळवले आणि 'भारत फोर्ज' हा कारखाना पुण्याला हडपसरला सुरू झाला.

या कंपनीचे संरक्षण क्षेत्रात आणि अंतराळ क्षेत्रात भरीव योगदान आहे. रणगाड्यांसारख्या संरक्षण क्षेत्रात तिची भरीव कामगिरी आहे. या शिवाय मोटारीचे सुटे भाग,ऊर्जा टॉवर्स, खाणकाम, रेल्वे, सागरी या क्षेत्रातही ती मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्यांनी नुतकेच जुलै 2022 मध्ये JS Autocast या कंपनीचे आग्रहण केले आहे. या कंपनीची स्थापना 1961 च्या जूनमध्ये नीळकंठ कल्याणी यांनी केली. या कंपनीच्या शेअरचा सध्याचा भाव 900 रुपयांच्या आसपास असून वर्षभरात त्यात 20 टक्क्यांनी वाढ व्हावी.

या कंपनीची नक्त विक्री आर्थिक वर्ष मार्च 2021 मार्च 2022 व मार्च 2023 मध्ये अनुक्रमे 6336 कोटी रुपये, 10461 कोटी रुपये, 12050 कोटी रुपये होती/असेल. व्याज, घसारा, कर, मुदती कर्जांचे हप्ते देण्यापूर्वी (EBITDA) आर्थिक वर्ष मार्च 2021, मार्च 2022 व मार्च 2023 साठी अनुक्रमे 861 कोटी रुपये, 2016 कोटी रुपये, 1900 कोटी रुपये होते/व्हावे. हिचे शेअरगणिक उपार्जन आर्थिक वर्ष मार्च 2021, मार्च 2022, मार्च 2023 साठी अनुक्रमे (2.7)रुपये, 23 रुपये, 18 रुपये होते/असेल. इथे माफक प्रमाणात गुंतवणूक करायला हरकत नाही.

SCROLL FOR NEXT