सिंगापूर : जगातील अनेक देशांमध्ये किड्यांचा अन्न म्हणून वापर केला जातो. आता सिंगापूरमध्ये अधिकृतपणे काही किड्यांना अन्न म्हणून मान्यता दिली जाणार आहे. सिंगापूरच्या खाद्य संस्थेने सरकारकडे अशा सोळा प्रजातीच्या किड्यांची सूची पाठवली आहे व तिला मान्यता मिळू शकते.
सरकारनेच अशा प्रकारची सूची मागवली होती आणि लवकरच तिला अनुमती मिळू शकते. सिंगापूरमध्ये याबाबतच्या नियमात बदल केला जात आहे. लवकरच पतंग, भुंगा, क्रिकेट, मधमाश्या, टोळ आदी प्रजातींच्या किड्यांना मानवी अन्न म्हणून मान्यता मिळेल. त्यांचे थेट सेवन करता येईल किंवा तळलेले किडे स्नॅक्स तसेच प्रोटिन बारसारख्या खाद्यपदार्थांच्या रूपात खातात येतील. सिंगापूर फूड एजन्सी याबाबत अनेक तज्ज्ञांचा सल्ला घेत आहे.
युरोपियन संघ तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया व थायलंडसारख्या काही देशांमध्ये विशिष्ट प्रकारच्या कीटकांना अन्न म्हणून परवानगी देण्यात आली आहे. या कीटकांमध्ये पोषक घटक अधिक असतात व ते आरोग्यदायी ठरू शकतात. सध्या या निर्णयामुळे सिंगापूरच्या फूड इंडस्ट्रीतही आनंदाचे वातावरण आहे. युरोपमध्ये पिवळ्या रंगाच्या ग्रब किड्याला खाण्यासाठी सुरक्षित मानले गेले होते. तिथे या किड्याचा वापर बिस्किट, पास्ता आणि ब—ेड बनवणार्या पिठात केला जात आहे.