वॉशिंग्टन : स्मार्टफोन्स किंवा इतर कुठल्याही मोबाईलवरून संवाद साधायचा तर त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मोबाईल टॉवर. मात्र, आता हे तंत्रज्ञानदेखील इतिहासजमा होणार आहे. यापुढे थेट अंतराळातील सॅटेलाईटमार्फत मोबाईलवर संवाद साधता येणार आहे. यासाठी गुगल कंपनीने काम सुरू केले असून आपल्या लेटेस्ट अॅन्ड्रॉईड 14 या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी हा सॅटेलाईट कम्युनिकेशन सपोर्ट देण्यावर गुगल सध्या काम करत आहे. स्पेसक्राफ्ट इंजिनिअरिंग कंपनी स्पेसेक्स आणि टी मोबाईल या दोघांनी या नव्या तंत्रज्ञानावर काम करायचे ठरवले आहे. यामुळे स्मार्टफोन्स थेट सॅटेलाईटशी जोडले जाणार आहेत. हे नवे तंत्रज्ञान सध्याच्या स्मार्टफोन्सवरही चालू शकणार आहे,
कारण ते सध्याच्या बँडविड्थवर अर्थात झउड स्पेक्ट्रमवर वापरले जाणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाबाबत अशी घोषणा करण्यात आली आहे की, अँड्रॉईड व्ही-14 च्या पुढील आवृत्तीमध्ये सॅटेलाईट कम्युनिकेशन सपोर्ट तयार करण्यावर सध्या काम सुरू आहे. तसेच सध्याच्या फोनमधील रेडिओ हार्डवेअर हे काम करेल. आता स्पेस एक्स आणि टी मोबाईल 2023 च्या उत्तरार्धात जेव्हा अँड्रॉईड-14 बाजारात आणतील तेव्हा नवीन उपग्रहाची बीटा चाचणी सुरू करण्यात होऊ शकते. सुरुवातीला ही सेवा फक्त अमेरिकेपुरती असेल आणि नंतर संपूर्ण जगभरात ही सेवा विस्तारित होणार आहे. मुख्य म्हणजे दुर्गम ठिकाणीदेखील ही सेवा उत्तम काम देईल. त्यामुळे रेंज नाही ही समस्याच संपणार आहे.