Latest

मुस्लिम समाजाची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

अमृता चौगुले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या बदनामीकारक वक्‍तव्याच्या निषेधार्थ सांगली, मिरज शहरातील मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी रस्त्यावर काही काळ ठिय्या आंदोलन करीत घोषणा दिल्या.

शर्मा यांनी वक्‍तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात मुस्लिम समाजाने ठिकठिकाणी असंतोष व्यक्‍त केला. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा मेसेज समाज माध्यमाद्वारे फिरू लागला. त्यानंतर सांगली आणि मिरज शहरातील हजारो मुस्लिम समाजातील कार्यकर्ते सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून शर्मा आणि केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या. शर्मा यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

ऑल इंडिया इमाम कॉन्सिलचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती मोहम्मद हनीफ शेख यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, शर्मा यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. कोणत्याही धर्माविरुद्ध अपशब्द वापरल्यास कडक कायदा तयार करावा, भाजप, आरएसएस या सारख्या संघटनांना लगाम लागावा. शेकडो नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होत निषेध केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT