Latest

मुलं जन्माला घालणारी मशिन की पास्ता आणि वाईन?

backup backup

करीना कपूर सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या कथित प्रेग्नन्सीविषयीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर करीना सध्या तिसर्‍यांदा गर्भवती असल्याचे बोलले जात आहे. पण, करीनाने स्वतःच या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. सैफने यापूर्वीच देशाच्या लोकसंख्येत मोठे योगदान दिले आहे, असेही ती म्हणाली होती. आता नुकत्याच एका मुलाखतीत, मी मुले जन्माला घालणारी मशिन आहे का? असा सवाल तिने केला.

माझी चॉईस माझ्यावर सोडा ना. वजन वाढण्याचे कारण पास्ता आणि वाईन आहे. मी 40 दिवस सुट्टीवर होते. मला आठवत नाही मी किती पिझ्झा खाल्ले, असेही ती म्हणाली. दरम्यान, करीना-सैफ या दाम्पत्याला तैमूर आणि जेह अशी दोन मुले आहेत. करीनाच्या कामाबाबत बोलायचे तर ती 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसणार आहे. शिवाय सुजॉय घोषची सीरिज 'डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स'चे शूटिंगही करीनाने पूर्ण केले आहे. यात ती जयदीप अहलावत आणि विजय वर्मासोबत आहे. याशिवाय रिया कपूरच्या एका चित्रपटातही ती दिसणार आहे.

SCROLL FOR NEXT