Latest

मुंबईतील दोन रुग्णालयांत २०० कोटीचा घोटाळा : प्रसाद लाड

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई महापालिकेच्या कुपर आणि भगवती रुग्णालयात २०० कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप भाजपचे सदस्य प्रसाद लाड यांनी बुधवारी विधान परिषदेत केला. या आरोपातून त्यांनी थेट ठाकरे परिवारातील एका व्यक्तीवर निशाणा साधल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत युवासेनेचा एक बडा पदाधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळी भगवती रुग्णालयामध्ये ४८३ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. यापैकी २०० कोटींचे काम इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकलमध्ये होते. परंतु निवेदेतील अटींचा भंग करण्यात आला. कंत्राटदाराला ६० ते ७० कोटी रुपये मिळणार आहे, असा आरोप लाड यांनी केला. महापालिकेचे १४० कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी लावावी, अशी मागणी लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर माहिती घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

SCROLL FOR NEXT