वॉशिंग्टन : मुंबई हल्ल्यातील आरोपी कॅनडातील व्यापारी तहव्वूर राणा याचे भारताला होणार असलेले प्रत्यार्पण रखडले आहे. राणा याने याप्रकरणी अमेरिकन न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राणा हा 26/11 च्या हल्ल्यातील आरोपी असून, सध्या तो अमेरिकेतील कारागृहात आहे.
प्रत्यार्पणाचे प्रकरण 20 महिन्यांपासून अमेरिकन न्यायालयात रखडले आहे. न्यायालय सुनावणीच घेत नाही. डेव्हिड कोलमॅन हेडलीचा बालमित्र असलेल्या राणाला भारताच्या मागोव्यामुळे लॉस एंजिलिसमध्ये 10 जून रोजी पुन्हा अटक करण्यात आली होती.